Belagavi

अर्थसंकल्पात कित्तूर विकास प्राधिकरणासाठी निधीची तरतूद नाही …

Share

शासकीय अर्थसंकल्पात कित्तूर विकास प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ १८ मार्च रोजी कित्तूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती मडीवाळ राजयोगिंद्र स्वामीजी यांनी दिली आहे.

कित्तूर विकास प्राधिकरणासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पात कित्तूर विकास प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. ही खेदजनक बाब असल्याचे सांगत याचा निषेध म्हणून १८ मार्च रोजी कित्तूर बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करून कित्तूर विकास प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी, असे कित्तूर कल्मठाचे मडीवाळ राजयोगिन्द्र स्वामीजी यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात कित्तूर विकास प्राधिकरणाला निधी न देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि अनुदान द्यावे या मागणीसाठी १८ मार्च रोजी कित्तूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कित्तूर कलमठाचे माडीवाळ राजयोगिंद्र स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

Tags: