Belagavi

कंडक्टरवरील हल्ला प्रकरण ताजे असतानाच ग्रामपंचायत सचिवांवर झाला जीवघेणा हल्ला…!!!

Share

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायत सचिवांवर हल्ला करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, त्यांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यावर कठोर कारवाई करून ग्रामपंचायत सचिवांना न्याय द्यावा अशी मागणी कित्तूर कर्नाटक सेनेचे अध्यक्ष महादेव तळवार यांनी केली आहे.

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सचिव नागप्पा कोडली यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते विक्रम येळ्ळूरकर आणि शिवू या त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केला. कंडक्टरवरील हल्ला ताजा असतानाच आंबेवाडी ग्रामपंचायत सचिवांवर झालेला हा हल्ला निंदनीय आहे. ग्रामपंचायत सचिवांवर जीवघेणा हल्ला

करणाऱ्या त्या त्रिकुटावर कठोर कारवाई करावी, हल्ला करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील यांचे सदस्यत्व रद्द करावे आणि त्याला किमान 6 वर्षे निवडणूक लढविण्यास मज्जाव करावा, अन्यथा समस्त कन्नड संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा गंभीर इशारा कित्तूर कर्नाटक सेनेचे अध्यक्ष महादेव तळवार यांनी दिला आहे.

Tags: