बेळगाव, ता. ९: महिला आज अबला राहिली नसून, ती सबला बनली आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने ती सक्षमपणे कार्य करीत आहे. महिलांमध्ये जागृती करून त्याना प्रत्साहन देण्याचे वेदांत फौंडेशनचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे विचार निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. देसाई यांनी व्यक्त केले. येथील वेदांत फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

महिलादिनानिमित्त महिलांसाठी वेशभुषा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी, १०० मीटर धावणे, पोट्याटो रेस, अग्नीचा वापर न करता पदार्थ बनविणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांचे उद्घाटन झाल्यानंतर बोलताना देसाई यांनी मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करण्याची गरज व्यक्त केली. विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने जारी केलेल्या योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्रीमती ललिता मोहन रेड्डी, गणपत पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
वेदांत फौंडेशनचे संस्थापक सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. संघटनेच्या अध्यक्षा सविता चंदगडकर यांच्या स्वागतानंतर ललिता रेड्डी, श्रीकांत आजगावकर, रविंद्र हरगुडे यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले.
श्रीमती जयश्री पाटील यांनी सुत्रसंचालन केले, एन. डी. मादार यांनी आभार मानले. यावेळी जी. बी. पाटील, मनोहर बेळगावकर, युवराज रत्नाकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. रवि गुरव , उमेश बेळगुंदकर, अर्जुन भेकणे व प्रविण पाटील यांनी विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम पाहिले.
विविध स्पर्धातील विजेत्या –
वेशभूषा
1) श्वेता कोलार (प्रथम)
2) प्रियंका चौगुले (द्वितीय)
3) गौतमी देशपांडे (तृतीय)
मेहंदी
1)प्रणिता धबाले (प्रथम)
2) वृशाली सुतार (द्वितीय)
3) वर्षा पाटील (तृतीय)
रांगोळी
1)सोनाली चौगुले (प्रथम)
2) मेघा छोडके (द्वितीय)
3) वैशाली दोडमणी 3rd
* १०० मीटर धावणे*
1) अनुराधा मडिवाळ (प्रथम)
2) प्रज्ञा पाटील (द्वितीय)
3) अश्विनी श्रीनिवास (तृतीय)
पोटॅटो रेस
1) श्रृती कोल्हार (प्रथम)
2) अश्विनी श्रीनिवास (द्वितीय)
3) दिव्या एनबेरा
फ्युअललेस कुकिंग
1) रेणुका कंग्राळकर (प्रथम)
2) सोनिया पाटील (द्वितीय)
3) चंदा पाटील (तृतीय)
संगीत खुर्ची
1)सोनाली मायानाचे (प्रथम)
2) रेणुका कंग्राळकर (द्वितीय)
3) प्रज्ञा पाटील (तृतीय)
Recent Comments