बेळगाव :गेली तब्बल 30 वर्षे सांडपाणी निचऱ्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या बसवन कुडची येथील बसवान गल्ली येथे आमदार राजू शेठ यांच्या आमदार फंडातून गटार बांधकामास सुरुवात झाल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने तब्बल 30 वर्षापासून त्रस्त असलेल्या बसवन गल्ली वासियांना आता दिलासा मिळाला आहे. कारण बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आपल्या आमदार फंडातून निधी मंजूर केल्यामुळे या ठिकाणी गटार बांधकामास सुरुवात झाली आहे. याबद्दल गावकऱ्यांनी आमदार सेठ यांचे आभार मानले आहेत. गावातील बसवण गल्ली येथील गटारीत कचऱ्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी तुंबलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. पावसाळ्यात गटारीचे पाणी घरात शिरत होते.
सदर समस्या गल्लीतील नागरिकांनी आमदार असिफ शेठ यांच्यासमोर मांडली असता त्यांनी लागलीच निधी मंजूर केल्यामुळे नवीन गटार बांधण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. बांधकामाच्या शुभारंभाप्रसंगी गजानन कोळूचे, सुनील अनगोळकर, सागर तारिहाळकर, शरद पाटील, विजय चौगुले, विजय हंनिकेरी, बसवराज चौगुले, किसन कोळूचे, शंकर मुचंडीकर, रामा दळवी, मनोहर अनगोळकर, यल्लाप्पा बेडका, भावेश दिवटे आदींसह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments