सैनिकांशिवाय देशाचे रक्षण दुसरे कोणीही करू शकत नाही. सीमेवर शत्रूंशी लढणारे योद्धे कधीही माजी होऊ शकत नाहीत. त्यांच्यापेक्षा चांगले देशभक्तीचे धडे देणारा दुसरा कोणीही नाही असे हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी सांगितले.

बेळगावातील कुमारगंधर्व कला मंदिरात प्रादेशिक माजी सैनिक कल्याण संघटनेचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला. हा समारंभ हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात पार पडला. निवृत्त लष्करी अधिकारी श्रीनिवास राव आणि डॉ. रवी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष विलास जंगळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांच्या सन्माननीय उपस्थितीत निवृत्त लष्करी अधिकारी राज शुक्ला यांनी संघटनेचे उदघाटन केले.
समारंभाला उद्देशून बोलताना हुक्केरीचे स्वामीजीं म्हणाले की, केवळ योद्धेच देशाला वाचवू शकतात. ज्या ठिकाणी योद्ध्ये आहेत तिथे देशद्रोहाच्या कारवायांना स्थान नसावे. या देशातील सर्व अधिकार माजी होऊ शकतात. मात्र, योध्ये कधीही माजी बनू शकत नाहीत. त्यांनी देशभक्ती वाढवण्यासाठी काम केले पाहिजे.मुलांमध्ये देशभक्ती रुजवली पाहिजे. ते म्हणाले की, सैनिकांनी त्यांच्या माता आणि कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. बाइट
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निवृत्त लष्करी अधिकारी श्रीनिवास राव म्हणाले की, सैनिक देशाच्या रक्षणासाठी मोठ्या कष्टाने आपले योगदान देतात. माजी सैनिकांना सुविधा मिळण्यास अडचण येत होती. मात्र, आता ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. ज्यामुळे माजी सैनिकांना आवश्यक सुविधा मिळण्यास मदत झाली आहे. ही संघटना मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगितले.
त्यानंतर, वरिष्ठ माजी लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले.
Recent Comments