Belagavi

१९६९ मध्ये शहीद झालेल्या शिवसैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

Share

शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगाव येथे १९६९ च्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात शहीद झालेल्या 67 शिवसेना हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

व्हॉइस ओव्हर : शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगाव येथील रामलिंगखिंड गल्ली येथील अशोक सर्कल येथे, १९६९ च्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या ६७ शिवसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी हुतात्मा स्तंभाला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना महाराष्ट्रातील शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले की, सीमावाद मिटत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने सीमावाद सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा राहील. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत त्यांना निषेध रॅली काढायची होती आणि महाराष्ट्र सरकारने सीमा विवाद लवकरात लवकर सोडवावा मागणी केली.

अखंड महाराष्ट्राची चळवळ पूर्ण होणे हीच हुतात्म्यांना व बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला खरी शांती लाभेल, असे मत महाराष्ट्र एकीकरण युवक समितीचे नेते शुभम शेळके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारने संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर भर द्यावा.  त्यानंतर बेळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

प्रकाश मरगाळे, नेताजीराव जाधव, अरविंद नागनूरी, दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, दिलीप बैलुरकर, राजकुमार बोकडे, आर.एम. चौघुले यांच्यासह शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Tags: