Belagavi

केंद्र सरकारचे बजेट शेतकरी आणि कामगारविरोधी : बेळगावात सीआयटीयूचे आंदोलन

Share

केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शेतकरी , संघटीत आणि असंघटीत कामगारांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत, आज बेळगावमध्ये “सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स” (CITU) तर्फे आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शेतकरी , संघटीत आणि असंघटीत कामगारांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण या बजेटमध्ये शेतकरी, असंघटीत कामगार आणि गरीबांना कोणत्याही प्रकारचा आधार मिळालेला नाही, असा आरोप केला गेला.
सामाजिक कल्याण योजनांसाठी दिलेले अनुदान कमी करण्यात आले आहे, आणि फक्त श्रीमंत वर्गासाठीच बजेट मांडले गेले आहे, असे CITU चे प्रमुख सचिव जे. एम. जैनखान यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांनाही, असंघटीत कामगारांना आणि गरीबांना केंद्र सरकार विसरले आहे का?” असा सवाल उपस्थित केला गेला. कोविडच्या काळातअंगणवाडी कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा दिली. तरीदेखील या बजेटमध्ये त्यांना दुर्लक्षित केले गेले, असे आंदोलनकर्त्या मंदा नेवगी यांनी सांगितले.

या आंदोलनात दिलीप वारके, मोटप्पा पूजारी, चेनम्मा गडकरी, जितेंद्र कागणिकर, तुळसम्मा माळदकर, गोदावरी राजापूर, सी. एस. मगदूम, सुमन गडाद, भारती जोगप्पन्नावर यांच्यासह इतर अनेक लोकांनी सहभाग घेतला.

Tags: