savdatti

सवदत्ती श्री यल्लम्मा मंदिर बंद !!??

Share

‘सवदत्ती तालुक्यातील येल्लम्माच्या डोंगरावर असलेल्या श्री रेणुका येल्लम्मा देवी मंदिर बंद नाही. भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नये असे सवदत्ती यल्लम्मा देवी मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी म्हणाले.

विकासाचे काम सुरू असल्या कारणाने सवदत्ती यल्लम्मा मंदिर दोन ते तीन वर्षांसाठी बंद असणार आहे. देवीचे दर्शन घेता येणार नाही अशी अफवा असून नेहमीप्रमाणे यल्लम्मा मंदिरात देवीची विशेष पूजा केली जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शन घेता येते. त्यामुळे भाविकांनी अफवा न ऐकता मंदिराला येऊन देवीचे दर्शन घ्यावे. जानेवारीमध्ये देवीची यात्रा यशस्वीरित्या पारपडली. आता फेब्रुवारीत भरत पौर्णिमा जत्रा देखील सुरळीत पार पडणार आहे.लाखो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंदिर बंदची माहिती सोशल मीडियावर आल्यावर कोणीही ती शेअरन न करता सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

Tags: