Banglore

असंतुष्ट भाजप कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घ्यायचे की नाही हे केपीसीसी अध्यक्षांवर अवलंबून ; गृहमंत्री जी. परमेश्वर

Share

केपीसीसीचे अध्यक्ष डी.के शिवकुमार यांच्या धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या विचारसरणीशी सहमत असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे या वक्तव्याचे सर्मथ करत गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आमच्या कामाच्या हालचाली तपासण्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना वॉचडॉगची भूमिका दिली आहे. आमच्या चुकांसाठी सकारात्मक सूचना दिल्यास त्या आम्ही स्वीकारू, असे ते म्हणाले.

बेंगळूरमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते . केपीसीसीचे अध्यक्ष डी.के शिवकुमार यांच्या धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या विचारसरणीशी सहमत असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे या वक्तव्याचे त्यांनी सर्मथ केले. असंतुष्ट भाजप कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घ्यायचे की नाही हे केपीसीसी अध्यक्षांवर अवलंबून आहे. ते म्हणाले की, भाजपच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलणार नाही.

भाजपच्या अंतर्गत भांडणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे प्रबळ विरोधी पक्ष नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, ह्या सर्व गोष्ठींवर जनतेचा लक्ष आहे. कायदेशीर आणि लोकशाही पद्धतीने, आम्ही आमच्या कामाची छाननी करण्यासाठी विरोधी पक्षाला वॉचडॉगची भूमिका दिली आहे. आमच्या चुकांसाठी सकारात्मक सूचना दिल्यास ते अवश्य स्वीकारू असे ते म्हणाले.

Tags: