Belagavi

कळपातून मेंढ्यांची चोरी… कारवाई करण्यास पोलिसांचा दुर्लक्ष मेंढपाळांचा जिलाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Share

घरफोडी आणि साखळी चोरीच्या घटनांनंतर आता बेळगावमध्ये मेंढ्यांची चोरी होण्याची घटना समोर आली आहे. कर्नाटक प्रदेश धनगर संघाच्या नेतृत्वाखाली मेंढपाळांनी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगाव तालुक्यातील विविध भागात मेंढपाळांच्या कळपातून मेंढ्या चोरीला जात असून कर्नाटक पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घरफोडी आणि साखळी चोरीच्या घटनांनंतर आता बेळगावमध्ये मेंढ्यांची चोरी होत आहे. बेळगाव तालुक्यातील विविध भागात मेंढपाळांच्या कळपातून मेंढ्या चोरीला जात आहेत मात्र कर्नाटक पोलिस कारवाई करत नाहीत असे आरोप करण्यात येत आहे . आज कर्नाटक प्रदेश धनगर संघाच्या नेतृत्वाखाली मेंढपाळांनी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

अलीकडे बेळगावच्या ग्रामीण भागात मेंढी चोरांचा वावर वाढला आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण व काकती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.कोल्हापुरातील पन्हाळा पोलिसांनी मेंढ्या चोरांना अटक केली आहे. मात्र, कर्नाटक पोलीस मेंढपाळांना प्रतिसाद न देता दिशाभूल करीत आहेत. मेंढपाळ्यांना न्याय व नुकसान भरपाई देण्यात यावी. चंदगड तालुक्यातील तुडये गावातील परशुराम मारुती पवार असे आरोपीचे नाव आहे. त्याचे मटणाचे दुकान आहे. तो रात्रीच्यावेळी मेंढ्या चोरतो. यामुळे मेंढपाळ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. असे माजी महापौर यल्लाप्पा कुरब यांनी सांगितले.


गेल्या तीन महिन्यांत दीडशेहून अधिक मेंढ्या चोरीला गेल्या आहेत. मेंढ्या चोरांची माहिती दिल्यानंतर चार तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी बेळगाव पोलीस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून मेंढपाळांना न्याय द्यावा, अशी मागणी नागेश गड्डे यांनी केली. बाइट

मेंढ्यांच्या कळपात फक्त एक किंवा दोन मेंढपाळ असतात. रात्रीच्या वेळी येऊन चोरटे शस्त्रांनी धमकावतात आणि मेंढ्या चोरतात. असे झाले तर आपण कसे जगू शकतो? कर्नाटक पोलीस आम्हाला प्रतिसाद का देत नाहीत? चोरट्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मेंढपाळ बाबू सांब्रेकरा यांनी केली. बाइट

अलीकडे कळपातून मेंढ्या चोरीच्या घटना सर्वत्र घडत आहेत. सीएम सिद्धरामय्या यांनी आम्हाला न्याय द्यावा.वचन दिल्याप्रमाणे आम्हाला परवाना देण्यात यावा. धनगर समाज वाचवण्यासाठी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी विनंती आंदोलकांनी केली. बाइट

या वेळी शिवाजीराव शहापूरकर, कृष्णा कुरब, मल्लप्पा पाटील, रामा होळकेरी, विठ्ठल सांब्रेकर आणि इतर मेंढपाळ सहभागी झाले होते.

Tags: