महात्मा गांधीजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सौहार्द कर्नाटक मंच, सौहार्द संपर्क अभियान आणि मानवी साखळी निर्मिती कार्यक्रम गुरुवारी कन्नड साहित्य भवन बेळगाव येथे पार पडला.
या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित साहित्यिक डी.एस.चौगुले म्हणाले कि, आज आपण संविधान बदलणार असल्याचे निर्भीडपणे सांगणाऱ्या शक्तीला सावध केले पाहिजे.गांधीजी आणि आंबेडकरांच्या मूल्यांना जाणीवपूर्वक नाकारणाऱ्या संघ परिवाराने केलेल्या घोषणा लक्षात घेतल्या नाहीत तर आपल्याला पुन्हा मागे जावे लागेल. भारतीय मातीत बंधुत्वाचे गुण आहे. याच आधारावर गांधीजींनी लढा दिला आणि संपूर्ण जगाला चकित करून आपले ध्येय साध्य केले. पण काही लोकांना ते नको झालंय असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी भारतीय कृषिक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौड मोदगी, डॉ. मीचल सुजा, मोहम्मद अश्रफ पाश्चापुरे, मानव बंधुत्व मंचाचे प्रमुख रवींद्र नायक, पर्यावरणवादी शिवाजीराव कागणेकर आदी उपस्थित होते


Recent Comments