Belagavi

बेळगावात शिवरामे गौडा गटाकडून जय महाराष्ट्रच्या घोषणेचा निषेध

Share

अनगोळ येथे धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसवताना कन्नडिगांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप शिवराम गौडा गटाने केला आहे. या संदर्भात, शिवराम गौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकुडी यांच्या नेतृत्वाखाली शहरात जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेधात “जय महाराष्ट्र” च्या घोषणांमुळे कर्नाटकमधील कन्नडिगांचा विश्वासघात झाल्याचे ते म्हणाले .

धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारताना, महाराष्ट्र राज्याचे प्रतीक असलेला “जय महाराष्ट्र” नारा आणि महाराष्ट्रातील पाहुण्यांचा समावेश यावर शिवराम गौडा गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली. गटाच्या नेत्यांनी आरोप केला की, कर्नाटकमध्ये कन्नडिगांविरुद्ध कटकारस्थान केले जात आहे. राज्याच्या अनुदानात कन्नड भूमीवर अन्याय होत आहे, आणि कन्नडिगांचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे, असे ते म्हणाले.

या आंदोलनादरम्यान, वाजिद हिरे यांनी आमदार अभय पाटील आणि महापौर तसेच उपमहापौर यांना आम्ही तुमच्या तोंडाला काळे फासू असा गंभीर इशारा दिला. वाजिद हिरेकुडी यांनी म्हटले. आमदार अभय पाटील यांनी महाराष्ट्रातील पाहुण्यांना आमंत्रित करून ‘जय महाराष्ट्र’ घोषणेद्वारे कर्नाटकमध्ये कन्नडिगांचा अपमान केला आहे.”

45 लाख रुपयांच्या राज्य अनुदानातून या मूर्तीचे उभारणी कार्य केले आहे, परंतु राज्यातील मंत्र्यांना आणि मान्यवरांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही . . तसेच, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमदार अभय पाटील , महापौर आणि उपमहापौरांवर कठोर कारवाई केली करावी अशी मागणी त्यांनी केली .

आंदोलनात शिवराम गौडा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी, त्यांनी कर्नाटकमधील कन्नडिगांच्या अस्मितेचा मुद्दा मांडत, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला सहन न करण्याचा इशारा दिला. यावेळी करवे शिवरामगौडा गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: