जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथे सेवा बजावत असताना लष्करी जवान महांतेश भैरनट्टी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . आज जवानांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेळगावी जिल्ह्यातील बैलहोंगलातालुक्यातील तिगडी गावातील सैनिक महांतेश हे भारतीय सैन्यदलात एसएसबी 10 व्या बटालियन, श्रीनगरमध्ये गेल्या 17 वर्षांपासून भारतीय सैन्यात सेवा बजावत होते. श्रीनगर येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
महांतेश यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या महांतेश बेरनट्टी यांचे पार्थिव आज या मूळ गावी तिगडी येथे शासकीय सन्मानाने आणण्यात आले.
या वेळी आमदार बाबासाहेब पाटील व माजी आमदार महांतेश दोड्डगौडर , बैलहोंगलचे ए.सी. प्रभावती पकीरापुर, बैलहोंगल तहसीलदार एच. शिरहट्टी, तिगडी ग्रामपंचायत अध्यक्ष कल्पना डोंकन्नवर, ग्रामलेखाधिकारीछत्रपती नायक व ग्रामस्थ अंत्यविधीत सहभागी झाले होते.
Recent Comments