Belagavi

शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणजे मळणी

Share

ज्यावेळी मळणी येते त्यावेळी शेतकऱ्याचा वर्षातील हा आनंदाचा क्षण असतो.. ही मळणी केली कशी जाते त्याचा आढावा देणारा हा रिपोर्ट…

सर्वात पहिला शेतात भात कापणी केल्यावर भाताची गंजी म्हणजेच वळी घातली जाते. मळनीची सुरुवात खळे बनवून मळणीसाठी जागा तयारी केली जाते. त्यानंतर तट्ट अंथरली जातात आणि मग त्यावर पिंजारा सहित असलेले भात पसरले जाते मग ट्रॅक्टर किंवा जनावरास द्वारे भातावर फिरवले जाते मग सुरू होते… मळनीची प्रक्रिया.

ट्रॅक्टर भातावर फिरवल्या नंतर पिंजरातून भात वेगळे होते दोन वेळा वळणा काढून भात आलटून पालटून ठेवले जाते. भाताचे दाणे पिंजरा पासून वेगळे होताच त्या गवताची गंजी घातली जाते. पूर्वी सुपाणी वारे देत भाताची रास केली जात होती मात्र आधुनिक तंत्राने पिंजरा मिश्रित भाताच्या दाने मशिनित घालून वेगळे केले जातात त्यामुळे व्हट्ट म्हणजेच गवत एका बाजूला आणि भाताचे दाने एका बाजूला होतात मग भात पोत्यात भरले जाते. बेळगावच्या ग्रामीण भाताची पोती घरी म्हणजेच धान्याची रास घरी नेणाऱ्या वाहनाची पूजा केली मगच धान्याची पोती घरी घेतली जातात.

सध्या बेळगाव परिसरात मळण्यांचा जोरात असला तरी ढगाळ वातावरणामुळे सुगी ही 15 दिवस उशीर झाली आहे. सुगी आणि मळणी शेतकऱ्याच्या वर्षभरात आनंद घेऊन येते… कारण पिकवलेले पीक घरी येणार असते. ब्युरो रिपोर्ट

Tags: