ऐतिहासिक मल्लम्मन बेलवडी गावात एका मुस्लिम कुटुंबावर स्थानिकांनी सामाजिक बहिष्कार घातल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे . . या कुटुंबाचे सदस्य लहान मुलांसोबत न्याय मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत . अखेर बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा त्यांनी ठोठावला आहे . मुस्लिम कुटुंबाला बहिष्कार घालण्याचे कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ही स्टोरी पहा!
पत्र्याची शेड गावकरी, न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अश्रू ढाळत असलेले मुस्लिम कुटुंब हे सर्व दृश्य बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मल्लम्मन बेलवडी गावातील आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मागणाऱ्या मुक्तुसाब हुजरती यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. गॅरेज चालवून जीवन निर्वाह करणाऱ्या गरीब मुस्लिम कुटुंबावर अत्याचार झाल्याचे आरोप आले आहेत.

एक गुंठा जमीनच्या वादावरून गावातील काही लोकांनी बहिष्कार घातल्याचे मुक्तुसाब हुजरती यांनी सांगितले. गावात दैनंदिन गरजेच्या वस्तू , प्यायचे पाणी मिळवण्यासाठीही त्यांना धडपडावे लागत आहेत. रोजच्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी ते बैलहोंगलला जावे लागत आहेत. दुसरीकडे गावातील बस स्थानकाजवळ असलेले त्यांचे ऑटो गॅरेजहे बंद केले आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले . बहिष्काराच्या मुद्द्यावर स्थानिक दोडवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली, मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असे मुक्तुसाब हुजरती यांची पत्नी कौसर बानू यांनी दुःख व्यक्त केले.
मुक्तुसाब हुजरती यांनी आपल्या घराच्या पाठीमागे 2016 मध्ये अडिवप्पा ईरप्पा मुनवळी यांच्याकडून प्लॉट विकत घेतला. त्या संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. मात्र, ही ग्रामपंचायतची मालमत्ता असल्याचे गावातील काही लोकांनी सांगितले आहे. ग्राम पंचायतीचे अध्यक्ष आणि सदस्य बसवराज नरिगेल यांच्यासह काही लोकांनी त्यांच्यावर अन्याय केल्याचे त्यांनी आरोप केले आहेत. पंचायतशी संबंधित कोणतीही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नाहीत. न्यायालयाचा आदेश न आणता अचानक त्यांची पत्र्याची शेड हटवली आहे. 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली हे शेड हटवण्यात आली आहे बेलवडी गावात आमचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे.

आमच्याकडेचे पैसे संपले आहेत, जीवनाची स्थिती कष्टकारक झाली आहे. आम्ही एक गुंठा जमीन पंचायतला दिली तर बहिष्कार उठवला जाईल, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. बहिष्कार घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. घटनेला एक महिना उलटला तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे सांगणारे हे कुटुंब बेळगावच्या जिल्हाधिकारी आणि एसपी कार्यालयात उपस्थित झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात न्याय मागण्यासाठी अश्रू ढाळणारे मुस्लिम कुटुंब त्यांच्यावरील अन्यायाची गोष्ट सांगत आहेत. एक महिना होऊन गेला, तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याने या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी तीव्र मागणी केली आहे.


Recent Comments