अनगोळ गावकऱ्यांनी पुतळ्याचे काम पूर्ण न झाल्याचे आरोप करत, अनावरण पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने महापौर सवीता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी पुतळ्याच्या कामाची पुनः तपासणी केली.
बेळगावच्या अनगोळ मधील चौकात छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला, काम पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. याच्या पार्श्वभूमीवर महापौर सवीता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आज कामकाजाची पाहणी केली.
याबाबत माध्यमांशी बोलताना महापौर सवीता कांबळे यांनी सांगितले की, काही लोक काम पूर्ण झालं नाही असा आरोप करत आहेत. त्यासाठीच आज कामाची पाहणी केली आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन सुमारे 40 लाख रुपये अनुदानातुन हे काम करण्यात आले आहे. शिष्टाचाराचे उल्लंघन करत कुठलेही कार्यक्रम होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
आणखी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी सांगितले की, काम पूर्ण झालं नाही अशी समाजमाध्यमांतून माहिती पसरवण्यात आली आहे. याची तपासणी महापौरांच्या सह आज करण्यात आली आहे आणि काम पूर्ण झालं आहे. अनगोळच्या स्थानिकांना विश्वासात घेऊन पुतळ्याचे अनावरण केलं जाईल. असे ते म्हणाले .


Recent Comments