हमी योजनांच्या नावावर सत्तेवर आलेल्या राज्य काँग्रेस सरकारने परिवहन बस दरवाढ केली आहे. आता ही दरवाढ पुन्हा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सरकारविरुद्ध धारवाडमध्ये भाजपाने तीव्र आक्रोश व्यक्त केला आणि मंत्री प्रियांक खर्गे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हुबळी धारवाड महानगर जिल्हा भाजपाच्या ग्रामीण शाखेच्या नेतृत्वाखाली या विरोध प्रदर्शनात भाजपाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी राज्य सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने केली. काँग्रेस पार्टी ‘पंच गॅरंटी’ योजनेच्या नावाखाली सत्तेवर आली होती आणि जनतेला आश्वासन दिले होते.
पण, त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने एकीकडे महिलांसाठी बसचे दर कमी करण्याचे सांगितले, तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे दरवाढ सुरू केली. परिवहन विभागात आधीच अनेक वेळा दरवाढ करण्यात आली असून, आता पुन्हा दरवाढ करून सरकार मध्यमवर्गीय जनतेला त्रास देत आहे, अशी टीका भाजपाने केली.
त्याचबरोबर, लिकरच्या किमती, वीज बिल, दूध दर आणि भू नोंदणी शुल्क यांसारख्या इतर गोष्टींमध्येही दरवाढ केली गेली आहे. यामुळे सरकार जनतेला अडचणीत आणत आहे, असा आरोप करण्यात आला.नावावरून ठेकेदार सचिनच्या आत्महत्येस मंत्री प्रियांक खर्गे कारणीभूत असल्याचा आरोप करीत , भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली , आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे


Recent Comments