Belagavi

गृहलक्ष्मी योजना महिलांसाठी जीवनाधार ठरावा – मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

सरकारच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचा उद्देश महिलांच्या जीवनाला आधार देणे आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास ट्रस्टच्या वतीने हिरेबागेवाडी गावात शनिवारी आयोजित महिला विषय गोष्टी आणि सामान्य सहाय्य केंद्राचे उद्घाटन करताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, “गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर करून महिलांनी स्वयंरोजगार सुरु करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे,” असे ते म्हणाल्या.

“गृहलक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जीवनाचा विकास, प्रत्येकाला शिक्षण मिळवून देणे आणि सर्वांनाच आरोग्य सुविधा मिळवून देणे,” असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिलांना आवाहन केले, “महिलांनी आपले आरोग्य जपले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सशक्त व्हावे, समाजाच्या आरोग्याच्या रक्षणात मदत करावी, सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण करावेत आणि आत्मविश्वास वाढवावा.”

धर्मस्थळ विकास संघाबद्दल त्या म्हणाल्या, “माझ्या 25 वर्षांच्या सहकार्याच्या अनुभवामुळे मला माहित आहे की धर्मस्थळ विकास संघ नेहमी समाजाच्या विकासासाठी काम करत आहे. त्यांचा धेय काय आहे हे लक्षात घेतल्यास आज संघ प्रत्येक घराला उजाळा देत आहे .

“आज महिलांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे, त्या प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. 25 वर्षांपूर्वी महिलांना पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता , परंतु आता त्या वेगळ्या धारेवर काम करत आहेत. महिलांना ध्येयानेच जग जिंकता येते,” असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्ष स्मिता पाटील, सुरेश इटगी, सतीश नाईक, लक्ष्मी अरिबेन्सी, पर्वतगौड आणि धर्मस्थळ ग्रामविकास संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: