तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला आणि न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा मिळावी या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव वकील संघटनेने आज बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वकिलांना न्यायालयाच्या आवारात सुरक्षा मिळावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले.
यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.किवडसण्णावर म्हणाले, कोर्ट परिसरात वकिलांवर केलेला हल्ला निंदनीय आहे. हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि न्यायाधीशांना, वकिलांना सुरक्षा पुरवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
वकील संघाचे सचिव वाय. के. दिवटे म्हणाले की, अलीकडे वकिलांवर हल्ले होत आहेत. राज्य सरकार आणि भारत सरकारने हल्लेखोरांवर वकील सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी. तसेच सर्व न्यायालय परिसरात वकिलांना सुरक्षा पुरवावी आणि त्यांना न घाबरता कर्तव्य बजावता यावे.
यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Recent Comments