Uncategorized

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Share

राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत घोषित करण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. आज बेळगाव जिल्हा प्रशासन कार्यालयात राज्य शेतकरी संघ व हरित सेना सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

पावसाच्या जोरदार हजेरीमुळे भात आणि इतर पिकांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ मदतीचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. भातपिकाच्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करावे , असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी अप्पासाहेब देसाई, मारुती कडेमणी, सुभास धायगोंडे, रामनगौड पाटील, चंद्रु राजाई, राजू कागणिकर, नामदेव दुडम, फकीरा सदावर यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: