खानापूर तालुक्यातील नंदगडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खानापूर तालुक्यातील नंदगड गावात कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्र्यांचा पाठलाग सुरु झाला आहे. अबालविरुद्ध महिलांसह प्रत्येकालाच भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष यल्लप्पा गुरव यांच्याकडे तक्रार केली. मात्र या समस्येकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामस्थांनी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून कुत्र्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
Recent Comments