Uncategorized

रुद्रेश यडवण्णावर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

Share

बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. याबाबत खडेबाजार डीएसपीकडे एक अनामिक पत्र आले असून, त्यात रुद्रेश यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बेळगाव तहसीलदार कार्यालयात एसडीए कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे. खडेबाजार डीएसपीना मिळालेल्या एका अनामिक पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्या आहे. या पत्रामध्ये दावा करण्यात आला आहे की, तहसीलदारांच्या जीप ड्रायव्हरचा या प्रकरणात मुख्य हात आहे. पोलिसांनी तहसीलदारांची नीट चौकशी केली तर संपूर्ण सत्य उघड होईल असे या पत्रात लिहिले आहे. हे पत्र पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, राज्यपाल, एसी आणि मानवाधिकार आयोगाला देखील पाठवण्यात आले आहे.

रुद्रेश यांच्या आई मल्लव्वा यडवण्णावर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “माझा मुलगा कधीही आत्महत्येसारखे कृत्य करणार नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून आम्हाला योग्य ती माहिती मिळत नाही. माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी आम्हाला न्याय मिळायलाच हवा.”

तसेच, “माझ्या मुलाची हत्या करणारे आरोपी जामीन मिळवून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. पोलिसांकडून योग्य तपास केला जात नाही. आम्हाला न्याय मिळावा म्हणून पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी तपास करावा,” अशी मागणी मल्लव्वा यांनी केली.

Tags: