Belagavi

भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Share

विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी, कायदेशीर जागरूकता आणि जागृती आवश्यक आहे. भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी न्याय आणि दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे.असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले .

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस विभाग आणि कर्नाटक लोकायुक्त बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलन जागृती सप्ताह-2024 च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कार्यरत आहेत. लोकायुक्त कार्यालयात जाऊन तक्रार करण्यास जनता घाबरत आहे. अशा लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.

लोकनियुक्त पोलिस निरीक्षक अन्नपूर्णा यांनी भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा दिली. डीसीपी निरंजन राज अर्स , महापालिका आयुक्त शुभा बी, जेष्ठ वकील राजेश जंबगी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक रमनगौडा कन्नोल्ली, जिल्हा पंचायतीचे मुख्य नियोजन संचालक गंगाधर दिवटर, कर्नाटक लोकायुक्तांचे सरकारी वकील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags: