जुनी हुबळी घटनेचा तपास मागे घेऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन आज बेळगाव मंदिर समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.
जुनी हुबळी येथील पोलीस ठाण्यावर झालेला हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान यादरम्यान जखमी झालेले पोलीस याप्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला राज्य सरकारने मागे घेतला असून याविरोधात आज बेळगाव मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
वोट बँकेसाठी राज्य सरकारने हिंदूविरोधी धोरण आणि अल्पसंख्याक तुष्टीकरण सोडून द्यावे. राज्यात जातीय दंगली घडवून आणणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. सार्वजनिक हित जपले पाहिजे. तसे न झाल्यास सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यापूर्वी संपूर्ण समाजाने जागे व्हावे, असा इशारा विश्व हिंदू परिषद बेळगावी शहर अध्यक्ष बसवराज बागोजी यांनी दिला.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना संरक्षण पुरविले तर देशाचे काय होणार? राज्यातील मारहाण झालेल्या पोलिसांची ही स्थिती असेल, तर सर्वसामान्यांची गती काय? सरकारने तुष्टीकरणाचे धोरण सोडले नाही तर जनतेचा रोष ओढवेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी बेळगाव मंदिर समितीच्या सदस्यांचा सहभाग होता.
Recent Comments