बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते 27 ऑक्टोबर 2024 रोजी रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व रोड रेस शिवबसव नगर रोड बेळगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.संपुर्ण भारत देशामधील एकूण 9 विभागीय झोन मधुन व फॉरेण झोन दुबई, कतार, शारजा, युएई, बहरीन,येथून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले असून या स्पर्धासाठी 1 सीबीएसई निरीक्षक भारतीय रोलर महासंघटना यांच्या वतीने 18 ऑफिशियल बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो यांच्या वतीने 20 ऑफिशीयल व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल चे 45 शिक्षक हे सर्वजण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत .
या स्पर्धेचे आज मोठ्या थाठात उद्घघाटन झाले गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डान्स शो व देशभक्ती वर गीत म्हणून या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले,यावेळी अमित घाटगे डायरेक्टर एसबीजी ग्रुप,शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचिती आंबेकर, ,उमेश कलघटगी, ज्योती चिंडक, सीबीएसई, निरीक्षक एच आर रविश, , मुख्य रेफ्री अलोक त्रिपाठी,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी, स्वरूप पाटील बेळगाव मधील इतर मान्यवर व शाळेचा स्टाफ या कार्यक्रमाला उपस्थित होते…
Recent Comments