Belagavi

2.73 कोटी रुपयांची अवैध वाहतूक… बेळगाव पोलिसांनी वाहनासह दोघांना केली अटक

Share

बेळगाव पोलिसांनी 2.73 कोटी रुपयांची रोकड कोणत्याही कागदपत्रांशिवाय वाहनातून बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असताना ती जप्त करण्यात आली असून दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सांगली येथून हुबळीच्या दिशेने अशोक लेलँड दोस्त गुड्स या वाहनातुन कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवैधरित्या पैशांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच बेळगाव पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या पथकाने छापा टाकून ही रक्कम जप्त केली.

या प्रकरणी , वाहनासहित रोख रक्कम जप्त करण्यात आली असून , महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन मेनकुदळे आणि मारुती मरगुडे यांना अटक करण्यात आली आहे . अटक केलेल्या आरोपींकडून 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पैशांची वाहतूक करण्यासाठी वाहनाच्या केबिनमध्ये विशेष बदल केल्याचे आढळून आले.

याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: