सरकारी योजनेंतर्गत ९ गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी , बसुर्ते गावातील २५० एकर जमीन संपादित करण्याचा प्रयत्न सुरु आहे . याच पिकाऊ जमिनीवर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असल्याने, या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आणि महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आम्ही आमची जमीन कोणत्याही परिस्थितीत घेऊ देणार नाही असे ठणकावून सांगून सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सरकारकडून तलाव भरणा योजना अमलात आणण्यात येत आहे . या अंतर्गत बसुर्ते गावातील २५० एकर जमीन संपादित करून त्या ठिकाणी धरण बांधण्यात येणार आहे . उन्हाळ्यात या धरणातुन ९ गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना आहे . मात्र या गावातील शेतकऱ्यांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने , आपली शेतजमीन या प्रकल्पासाठी गेली तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न इथल्या शेतकरी आणि महिलांनी केला आहे . आज शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या बसुर्ते ग्रामस्थांनी आम्ही आमची शेती देणार नाही असा निर्धार करून , घोषणाबाजी केली .
यावेळी बोलताना इथल्या ग्रामस्थांनी सांगितले कि , आम्ही आमच्या शेतीवरच उपजीविका करतो . या शेतीशिवाय आमच्याकडे दुसरे उदरनिर्वाहाचे साधन नाही . पश्चिम भागात मराठी शेतकऱ्यांची जमीन आहे . आणि या ना त्या कारणाने ती जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे . आतापर्यंतच्या इतिहासात झाला नाही एवढा अन्याय गेल्या १५ वर्षांपासून शेतकऱ्यांवर होत आहे .. सरकारने हा प्रस्ताव मागे घ्यावा . या जमिनीवर धरण बंधू नये , अन्याय करू नये , आमच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना मूठमाती देत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला .
यावेळी बसुर्ते गावातील महिलानी देखील जमीन संपादित करण्यास तीव्र विरोध दर्शवला . आमची जमीन गेली तर आम्ही खायचे काय असा सवाल त्यांनी केला . माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि ग्रामस्थानी जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली
बेळगाव पश्चिम भागात बहुसंख्य मराठी शेतकरी आहेत . याआधीदेखी तुरमुरी येथील शेतकऱ्यांची जमीन कचरा डेपो साठी घेण्यात आली . शेतकऱ्यांची जमीन सोडा नाहीतर भविष्यातील परिणामाना सामोरे जाण्याची तयारी ठेवा . या विरोधात कुठल्याही परिस्थितीत शेतकरी एकजुटीने लढा देतील असे माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले .
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी आंदोलनस्थळी येऊन सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारले . आणि बसुर्ते गावातील शेतकऱ्यांची मागणी सरकार दरबार पर्यंत पोचवेन .मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , आणि सर्व मंत्री तसेच संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करू असे अश्वसन दिले .
यावेळी बसुर्ते गावातील शेतकरी , महिला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते .
Recent Comments