भारतीय संस्कृती, वारसा आणि हिंदू धर्म यांचा स्वतःचा इतिहास आहे. आपला देश विविधतेत एकता असलेला देश म्हणून ओळखला जातो बेळगाव तालुक्यातील हलगा गावात ह्याच एकात्मतेचे दर्शन , आजच्या श्री दुर्गामाता दौडीत घडले.
भगवा फेटा , पांढरे कपडे घालून, हातात धार्मिक ध्वज घेऊन, धार्मिक जागृतीच्या घोषणा देत, तर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत, तर दुसरीकडे विश्वगुरु जगज्योती बसवेश्वरांना वंदन करण्यात येत होते. बेळगाव तालुक्यातील हलगा गावात श्री दुर्गामाता दौड दरम्यान ही दृश्ये पाहायला मिळाली .
गावात आज अतिशय प्रसन्न वातावरण होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हलगा यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवतीर्थापासून सुरू झालेल्या दौडीत लहान मुलांनी , जिवंत देखावे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आई तुळजा भवानी, भद्रकाली, रोहिडेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभारण्याचा निर्धार, राधाकृष्ण, ग्रामीण जीवन , बलात्काऱ्यांना शिक्षा आदी देखावे सादर करण्यात आले .
गावातील प्रत्येक गल्ली आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. महिलांनी आरती करून दौडचे स्वागत केले. दौड गावातील विविध मार्गांवरून जाऊन , श्री दुर्गा माता मंदिरात येऊन सांगता झाली.
Recent Comments