savdatti

शक्ती योजनेमुळे विद्यार्थी बनत आहेत शक्तिहीन : सवदत्ती बसस्थानकावर जादा बसेससाठी विद्यार्थ्यांचे अचानक आंदोलन

Share

ग्रामीण भागातील गावांना जादा बसेस देण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती शहरातील बसस्थानकासमोर बस थांबवून आंदोलन केले.

गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर बस नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत . . शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेळेवर वर्गात पोचता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . शक्ती योजनेमुळे बसेस महिलांनी तुडुंब भरून जात आहेत . यामुळे विद्यार्थी वर्गाला बसेस उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब अनेक वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊनही उपयोग झाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

शहरातील बसस्थानकासमोर जादा बसेस सोडण्यात याव्यात, या मागणीसाठी आज सवदत्ती येथे काही काळ बस थांबवून विद्यार्थ्यांनी निषेध केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन उग्र स्वरूप धारण कारण्याआधी सवदत्ती पोलीस तसेच आगार व्यवस्थापक यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

जादा बस सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले .

Tags: