Belagavi

बेनकनहळ्ळी येथे दुर्गामाता दौडमुळे नवचैतन्य

Share

बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे दुर्गामाता दौडला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.

दौडमुळे गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दौडच्या माध्यमातून तऊणाई एकवटली असून बेनकनहळ्ळी येथे जल्लोषात दौडला प्रारंभ करण्यात आली.. तरुण व तरुणींनी अंगावर पांढरा कुर्ता परिधान केला होता. डोक्यावर भगवे फेटे व पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. यामुळे दौड मध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. शस्त्रपूजा, ध्वजपूजन करून ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र झाल्यानंतर दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली.

दौडमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे गावे दणाणून गेली होती. कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन दौडची रुपरेषा ठरविली. दुर्गामाता दौडला सुरुवात होणार असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत गल्ल्यांमध्ये सजावटीचे काम तरुण वर्ग व्यस्त होता. याबाबत येथील धारकऱ्याने इन न्यूजला प्रतिक्रया दिली.

गणेशपुर, ओमनगर, माउली नगर आणि हिंदुनगर आदी भागातून दौड काढण्यात आली.

Tags: