Belagavi

श्री दुर्गामाता दौडीचा दुसरा दिवशी जल्लोषात

Share

विविध स्फुर्तीगीते आणि चैतन्यमय वातावरणात श्री दुर्गामाता दौडचा दुसरा दिवस जल्लोषात पार पडला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडमध्ये हजारो तरुणांनी सहभाग घेत वातावरणात चैतन्य निर्माण केले.

मिलिटरी महादेव येथील शिवतीर्थ पासून श्री दुर्गामाता दौड ला आज सुरुवात करण्यात आली. गल्लोगल्ली श्री दुर्गामाता दौडचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. प्रत्येक ठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून दौडचे स्वागत केले. भगवे फेटे आणि शुभ्र गणवेशातील धारकऱ्यांनी दुर्गामाता दौड मध्ये सहभाग घेतला होता.

ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडन्स रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, मद्रास स्ट्रीट, कुंती माता मंदिर, फिश मार्केट, तेलुगु कॉलनी, दुर्गामाता मंदिर, खानापुर रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौकातुन श्री जत्तीमठ देवस्थानाकडे सांगता झाली.

शनिवारी कित्तूर चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरापासून दौड सुरु होणार असून तिथून पुढे काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी.बी. रोड, आरटीओ सर्कल, छत्रपती शिवाजी नगर, फोर्ट रोड, गांधीनगर मार्गे किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात येऊन दौडची सांगता होणार आहे.

Tags: