Belagavi

बैलहोंगल जिल्हा निर्मितीची माजी आम. महांतेश दोड्डगौडर यांची मागणी

Share

बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास बैलहोंगल तालुक्याचे सर्वप्रथम जिल्हा म्हणून विभाजन करावे, अशी मागणी कित्तूरचे माजी आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी केली.

बेळगाव मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, जिल्ह्याचे विभाजन करायचे असेल तर बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर, सौंदत्ती यांचे विलीनीकरण करून बैलहोंगल हे जिल्ह्याचे मुख्यालय करावे. उपविभाग स्तरावरील सर्व कार्यालये आधीच कार्यरत असून बैलहोंगल जिल्हा होण्यासाठी पात्र आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

डीसीसी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वांची बैठक झाली, बैठकीत डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदावर चर्चा झाली, अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांच्यात मतभेद नाहीत, रमेश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी यांना निवडणुकीबाबत विनंती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags: