घटस्थापना व नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावात श्री लक्ष्मी महिला मंडळाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हिंदू परंपरेनुसार नवरात्रोत्सव खूप महत्त्वाचा आहे आणि अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाल्याने मला आनंद होत आहे. येथील महिला मंडळाने समाजासाठी कार्य करावे असे मत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात दरवर्षी येणाऱ्या बेळगाव ग्रामीण भागातील भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली. बेळगाव ग्रामीण क्षेत्रात सर्वत्र पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून आणखी अनेक प्रकल्प आणण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी सर्वांचे आशीर्वाद आवश्यक आहेत असे त्या म्हणाल्या.
यावेळी शुभांगी राजगोळकर, विमला सकरे, लता शिवणगेकर, अरुण देवण, दीपक पाटील, वैजू राजगोळकर, सुरेश पाटील, विनायक पाटील, रवी पाटील, गोपाळ चौघुले, रोहणा पाटील, ज्योतिबा बडस्कर, शिवाजी गुरव, बाळाराम कदम, नाना पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments