बेळगावच्या ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत वाढली असून हिंडलगा येथे चोरट्यांना झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
बेळगाव शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पहाटे चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला बेळगाव ग्रामीण भागातील हिंडलगा येथे झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्या असून पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल नागरीकातून संताप व्यक्त होत आहे.
हिंडलगा आणि मारिहाळ येथे घडलेल्या चोरी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग म्हणाले, विविध पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या चोरीच्या घटनेतून गुन्हेयागारांना अटक करण्यात आली असून अद्याप काही आरोपींचा शोध जारी आहे. एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, 80 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चोरीमध्ये वापरलेल्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलीस विभाग कारवाई का करत नाही? पोलीस खाते चोरीच्या गुन्ह्यांची उकल का करत नाही ? चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात बसवलेले सीसी कॅमेरे सक्रिय नाहीत का? त्यांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देत नाही का, असा सवाल करत प्रसारमाध्यमांनी शहर पोलिस आयुक्तांना खडेबोल सुनावले. बेळगाव शहरात स्मार्टसिटीच्या वतीने एकूण 280 सीसी कॅमेरे बसविण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांनी दिली. स्मार्ट सिटी लिमिटेड त्यांचे व्यवस्थापन करत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच बैठकीत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments