बेळगावच्या एका प्रभावशाली मंत्र्याने जमीन हडप केली, असे स्फोटक विधान भाजपचे सरचिटणीस पी. राजीव यांनी केल्याने बेळगावकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बेळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे सरचिटणीस पी राजीव म्हणाले, बेळगावातील एका प्रभावशाली मंत्र्याने जमिनी हडप केल्या असून लवकरच कागदपत्रे जाहीर करणार असल्याचे स्फोटक विधान केले. मुडा प्रकरणात आपली चूक झाकण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मनीष करबीकर यांची लोकायुक्तांच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती, असा आरोप त्यांनी केला.
आपल्याविरुद्धचा खटला सीबीआय किंवा लोकायुक्तांकडे जाईल हे त्यांना आधी समजले. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर स्वतःच्या बचावासाठी केला आहे. लोकायुक्तांच्या विरोधात ७० हून अधिक प्रकरणांची चौकशी सुरू असताना त्यांनी लोकायुक्तांची शक्ती कमकुवत करण्याचे काम केले होते. आता मुडा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी आपल्या बचावासाठी सीबीआय तपासाची खुली संधी परत घेतली आहे. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा हा अट्टाहास आहे, असे ते म्हणाले.
भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सीएम सिद्धरामय्या यांनी म्हैसूर दसऱ्याच्या उद्घाटनात भाग घेऊन संविधानाचा अवमान केला अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस सरकारच्या प्रत्येक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून एम.बी.पाटील, संतोष लाड यांच्यासहित अनेक मंत्र्यांचा यात समावेश आहे. हमी योजनांच्या माध्यमातून जनतेची फसवणूक होत असून गेल्या ४ महिन्यांपासून लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नाही, काँग्रेस सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप पी राजीव यांनी केला.
ते पुढे म्हणाले, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे, भाजपमध्ये बेशिस्तपणा खपवून घेतला जात नाही, बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही सुरळीत सुरु आहे, से ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिल बेनके, मुरुगेंद्रगौडा पाटील, माजी आमदार संजय पाटील यांची उपस्थिती होती.


Recent Comments