महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने प्रबुद्ध भारत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विनायक नगर येथील बोधी ट्री शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले
प्रबुद्ध भारत एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या रमेश द्यामन्नावर यांचा शालेय व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रबुद्ध भारत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमेश द्यामन्नावर म्हणाले की, विनायक नगर येथील प्रबुद्ध भारत एज्युकेशन सोसायटीतर्फे बोधी ट्री इंग्लिश मीडियम स्कूल चालविण्यात येत असून, शाळेच्या विकासासाठी कठोर परिश्रम घेऊन कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. गरीब लोकांनाही इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळेल यासाठी शाळेची सुरुवात करण्यात आल्याचे ते म्हणाले.

या सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी रमेश द्यामन्नावर यांची तर उपाध्यक्षपदी राहुल मेत्री यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. गांधी जयंतीनिमित्त आज शाळेत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती राहुल मेत्री यांनी दिली.
यावेळी रमेश द्यामन्नावर, राहुल मेत्री, राजेंद्र आसुटे, एस.एच. कांबळे, भीमराव पवार आदींसह शाळेतील शिक्षकांनी श्रमदानात सहभाग घेतला.


Recent Comments