1924 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी सहभाग घेतला. या अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त गांधी पदयात्रा तसेच महात्मा गांधी जयंतीचे आचरण करण्यात आले होते .
बेळगावातील रेल्वे स्टेशन सर्कलजवळील मिलिटरी महादेव मैदानावर आज बेळगावमधील राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून आयोजित गांधी पदयात्रेत गांधी टोपी परिधान करून हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर काँग्रेस विहिरीनजीक असलेल्या विरसौध येथे भेट देऊन गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनया नवलगट्टी म्हणाले, गांधीजींच्या साध्या सज्जन व्यक्तिमत्त्वाच्या तत्त्वांनी आज जगाला खूप काही दिले आहे. महात्मा गांधींनी अहिंसेच्या तत्त्वांवर आधारित स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व संपूर्ण देशासाठी केले.
यावेळी रोहिणी पाटील, प्रदीप एमजे, आयेशा सनदी, सलीम खतीब, नगर सेवक खुर्शीद मुल्ला, राजेंद्र पाटील, प्रा. आर.पी.पाटील आदींचा सहभाग होता.


Recent Comments