Belagavi

आयपीएस अधिकारी चंद्रशेखर यांचे अपमानास्पद वक्तव्य

Share

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याविरोधात अपमानास्पद बोलणाऱ्या एडीजीपी चंद्रशेखर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलागी यांनी केली.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलागी यांनी पत्रकारांशी बोलताना, एडीजीपीनी केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले, हे निंदनीय आहे. चंद्रशेखर हे काँग्रेसच्या एजंटसारखे वागत आहेत. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास राष्ट्रपतींना पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Tags: