बेळगाव शहराच्या हद्दीतील भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील सिंह शुक्रवारी पिंजऱ्यातून निसटला आणि शनिवारी पुन्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला शोधून पुन्हा पिंजऱ्यात जेरबंद केले .
दोन सिंहांना प्राणीसंग्रहालयात आणून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. प्राणीसंग्रहालयातील सिंह आणि इतर प्राणी-पक्ष्यांना पाहण्यासाठी या प्राणीसंग्रहालयात दररोज मोठ्या संख्येने लोक येत असत. पिंजऱ्यातील दोन सिंहांपैकी एक सिंह निसटून बेपत्ता झाला होता . बेपत्ता सिंहाच्या पार्श्वभूमीवर काकती स्टेशनचे पोलिस प्राणीसंग्रहालयात तपासणीसाठी गेले होते. मात्र त्यांनी पोलिसांना चुकीची माहिती देऊन परत पाठवले होते . मात्र आता बेपत्ता झालेल्या सिंहाला पुन्हा पिंजऱ्यात टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


Recent Comments