Chikkodi

गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : ग्रा.पं. अध्यक्ष महांतेश पाटील

Share

निप्पाणी तालुक्याच्या हुन्नरगी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रापं अध्यक्ष महांतेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

सीसी रोड, गटारी, पाइपलाइन, पाण्याचे टँकर यासह विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष महांतेश पाटील म्हणाले की, पावसामुळे गावातील मुख्य रस्ते पूर्णपणे खराब झाले असल्याने १५ व्या आर्थिक आराखड्यांतर्गत सीसी रोड, गटारी, पाईपलाईन, पाण्याचा टँकर यासह विविध विकासकामासाठी १२.६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून या भागातील अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक विकासकामे करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा अनिता सुतळे, ग्रामपंचायत सदस्य वृषभ चौगुले, मुन्शीलाल मुजावर, विनोद मगदुम्म, सुजाता किल्लेदार, बिस्मिल्ला जमादार, भारती बरगाळे, दादासाहेब किल्लेदार, अमर स्वामी, सुरज किल्लेदार, पिंटू जमादार, अश्विन पाटील, विद्या पाटील,कविता पाटील,दीपा अरदंडे, छाया आरगे, कुणाल सुतळे, सतीश किल्लेदार, महावीर पाटील, उमेश पाटील, राकेश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

Tags: