Belagavi

मूल नसलेल्या अनेक जोडप्यांची घेतला सचिन हॉस्पिटलच्या वंध्यत्व निवारण शिबिराचा लाभ

Share

मिरज येथील सचिन हॉस्पिटल मध्ये मूल न झालेल्या दाम्पत्यांसाठी वंध्यत्व निवारण आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते . मूल न झालेल्या अनेक जोडप्यांनी या शिबिराचा लाभ घेतला .

सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुल न झालेल्या दांपत्यांना व स्त्रियांमधील विविध आजारावर हॉस्पीटलच्यावतीने उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली होती . सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हॉस्पीटलच्या वतीने राबविणेत येणाऱ्या सामाजिक उपक्रमापैकी एक म्हणजे मोफत तपासणी शिबिर. रविवारी २२ सप्टेंबर रोजी हे शिबीर पार पडले . शिबिरामध्ये मोफत तपासणी औषधे दिली गेली व शिबीरामधील पेशंटना आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया ह्या अत्यल्प दरामध्ये करण्यात आल्या .

या शिबिराच्या माध्यमातून मूल न झालेल्या दांपत्यांच्या अर्थातच स्त्री व पुरुष यांचे दोषाविषयी मार्गदर्शन व टेस्ट ट्यूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी संखोल मार्गदर्शन करण्यात आले . . व विशेषतः (IUI) गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या केलेल्या शुक्राणूंचे रोपण, वीर्यपेढी, स्त्रीबीजदान, गर्भ गोठवून ठेवणे, IVF, ICSI, IMSI, व Vitrification याच बरोबर बंद गर्भनलिका चालू करणे, स्त्रीबिज तयार न होणे यावर मार्गदर्शन करण्यात आले .

पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंमधील दोष, संख्या कमी असणे, ताकद (Motility) कमी असणे व हालचाल कमी असणे, शुक्राणू मृत असणे, लैगिंक समस्या यावर आधुनिक उपाचाराची व मॉयक्रोसर्जरीची माहिती दिली. टेस्ट ट्यूब बेबी व (IUI) तंत्रज्ञानमध्ये अनेक प्रकार असतात. स्त्री व पुरुषामधील दोषानुरुप त्याची उपचारपध्दती निवडावी लागते व त्या अनुषंगाने खर्च येत असतो.

स्त्री आरोग्यामध्ये पाळीच्या गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाला सूज, पांढरे जाणे, यावर गर्भाशय आजारावर दुर्बिणीद्वारा व तंत्रज्ञानाने आधुनिक उपचार करता येते. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या आजारावर आधुनिक मशिनचा वापर करुन लवकर निदान व उपचार करणाऱ्या तंत्राविषयी माहिती दिली गेली . , गर्भाशयाच्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रियेची गरज असल्यास आधुनिक पद्धतीने व कमी खर्चामध्ये करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली .

आज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध टेस्ट ट्युब बेबीची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ञ डॉक्टरांची टीम असल्यामुळे वंध्यत्वातील उपचाराचा यशाचा आलेख जास्त आहे. म्हणजेच मूल होण्याचे प्रमाण अधिक आहे. पुरुष व स्त्रीवंध्यत्व, लैगिंक समस्या व गुप्तरोग, शुक्राणु कमी असणे, अजिबात नसणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, इंद्रियांची समस्या, शीघ्रपतन, नपुंसकता, स्वप्नदोष, अनेक आजार मानसिक कारणाने व वयोमानानुसार आलेली कमजोरी, विवाहपुर्व व विवाहानंतरच्या समस्यांसाठी आधुनिक उपचार वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गजन्य व गुप्तरोगावर मार्गदर्शन व उपचाराची सोय.

सुरक्षित मातृत्व व सुदृढ बालक ही या रुग्णालयाचे वैशिष्ट्य आहे. विविध घटकांना आर्थिक कुवतीनुसार सुविधा व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमधील औषधोपचार व टेस्ट ट्युब बेबी या तंत्रज्ञानाने अपत्य प्राप्तीचे भाग्य लाभले आहे. याचे समाधान डॉक्टरांच्या बोलण्यातून व्यक्त झाले .

Tags: