Belagavi

अपहरण-हनीट्रॅप प्रकरणी शहापूर पोलिसांची कारवाई :चौघांना अटक

Share

अपहरण आणि हनीट्रॅप प्रकरणाबाबत बेळगाव शहापूर पोलिसांनी तरुणीसहित चार जणांना अटक केली

याबाबतचे वृत्त असे कि , विनायक सुरेश कुरडेकर (रा. मंगळवार पेठ टिळकवाडी, बेळगाव) यांच्या ओळखीतील दिव्या प्रदीप सपकाळे नामक तरुणीने झोपलेल्या अवस्थेत आपल्या खांद्यावर हात ठेवल्याचा व्हिडीओ बनवला आणि ह्या व्हिडिओद्वारे अन्य तीन आरोपींना या प्रकरणात सामील करून घेऊन , अपहरण केल्याचे भासवत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. यानुसार विनायक कुरडेकर यांनी 15 लाख रुपये रक्कम दिली . मात्र उर्वरित 10 लाख रुपये देण्यासाठी त्यांना आरोपींनी त्रास दिल्याने विनायक सुरेश कुरडेकर यांनी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांच्या सूचनेनुसार डीसीपी रोहन जगदीश, गुन्हे व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अर्स, मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.एस.एस.सिमानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरु केला.

हे प्रकरण अपहरण-हनीट्रॅप असल्याचे लक्षात येताच दिव्या प्रदीप सपकाळे (वय : 23 रा. बसवाण गल्ली, शहापूर बेळगाव), प्रशांत उर्फ स्पर्श कल्लाप्पा कोलकार (वय: 25 वर्षे रा. गाडे मार्ग शहापूर बेळगाव) कुमार उर्फ डॉली अर्जुन गोकरक्कनवर (वय 29 रा. ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी, बेळगाव) आणि राजू सिद्राय जडगी (वय: 29 रा. वाल्मिकी गल्ली कणबर्गी, बेळगाव) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 13,40,000/- रोख, गुन्ह्यात वापरलेले 3 मोटारसायकल व एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या तपास पथकात शहापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस.एस. सिमानी, एएसआय बी.ए. चौगला, आर.आय. नंदी, सीएचसी नागराज ओसप्पगोळ, शिवशंकर गुड्डापगोळ, सीपीसी श्रीधर तलवार, जगदीश हादिमनी, संदीप बागडी, सिद्धराम मुगलवार, कावेरी कांबळे, प्रतिभा कांबळे यांचा सहभाग होता . या कारवाईत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी कौतुक केले आहे.

Tags: