Belagavi

अथणी तालुक्यात 12 हून अधिक घरफोड्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणीतील कृष्णा कॉलनी येथे रात्री उशिरा घरफोडी करण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे.

या चोरीच्या घटनेत एक लाखाहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत, अशी माहिती येथील स्थानिकांनी केली आहे. यामागे सुमारे 5 ते 6 जणांची टोळी असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास अथणी पोलिस करीत आहेत.

Tags: