पावसाळ्यामुळे रुग्ण चिंतेत असतानाच रुग्णालयाच्या भिंतीवर बुरशी पकडल्याची बाब निदर्शनात आल्याने बेळगाव जिल्हा रुग्णालय आज पुन्हा एकदा येथील बेशिस्तीमुळे चर्चेत आले आहे.
बेळगावचे जिल्हा रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. रुग्णालय प्रशासनाच्या अस्ताव्यस्त नियोजनात आता आता आणखी एक भर पडली असून येथील भिंतींवर बुरशी चढल्याचे दिसून आले आहे. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हा प्रकार घडला असून हि बुरशी साफ करणे गरजेचे होते. मात्र याचठिकाणी औषधे आणि ऑक्सिजन पुरविणाऱ्या वाहिन्याही दिसून येत असून अशाच परिस्थितीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पावसामुळे आधीच रोगराई वाढली असून रुग्णालयातील या समस्येमुळे रुग्णांच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन आणि औषधे या बुरशीमुळे खराब होण्याची शक्यता असते. या रुग्णालयात गरीब, मध्यमवर्गीय लोक उपचारासाठी येतात. मात्र, येथील परिस्थिती चिंताजनक असून, संबंधित अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करावी, अशी रुग्णांची मागणी आहे.


Recent Comments