Belagavi

मुसळधार पावसात पालकमंत्र्यांनी केली बळ्ळारी नाल्याची पाहणी

Share

पावसामुळे बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बळ्ळारी नाला परिसराला भेट देऊन पाहणी केली.

पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून बळ्ळारी नाला, लेंडी नाला, नागझरी नाल्याच्या दोन्ही बाजूला उगवलेली जलपर्णी आणि गाळ हटविण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली होती.. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्र्यांनी या भागाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

मुसळधार पावसातही जिल्हा पालकमंत्र्यांनी आज बळ्ळारी नाला परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार असिफ सेठ, समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

नाला परिसरातील अतिक्रमण हटवून कालवे स्वच्छ करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तसेच नाल्याचा विकास करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा पालकमंत्र्यांकडे करण्यात आली

Tags: