Belagavi

पंडित पलुस्कर यांचे स्मरण; गुरुवंदना कार्यक्रम

Share

स्वरसाधना संगीत महाविद्यालयाच्या वतीने रविवारी बेळगाव येथील सरस्वती वाचनालयात पंडित पलुस्कर यांचे स्मरण व गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावातील विविध कलावंतांचा सत्कार करण्यात आला. अलंकार व विशारद पदवी संपादन केलेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वरसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन व सुगम संगीत सादर केले.

जितेंद्र साबण्णावर, नितीन सुतार व संचिता पाटील यांनी तबला साथसंगत तर चैत्र अध्यापक व श्रुती पाटील यांनी हार्मोनिअम साथसंगत केली. सु. न. पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. माधुरी मुतालिक देसाई पाहुणे कलाकार म्हणून आली आणि तिच्या मधुर गायनाने आणि भक्तिगीतांनी मनोरंजन केले.

सीता बैलकेरी यांनी स्वागतपर भाषण करून संगीत विद्यालयाची छोटीशी ओळख करून दिली. राजश्री खोपर्डे यांनी पंडित पलुस्कर यांच्या जीवन कर्तृत्वाचे वर्णन केले. वंदना कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. जानकी घोरपडे यांनी बेळगावातील कलाकारांचा परिचय करून दिला. सविता कट्टी यांनी विद्यालय विशारद व अलंकार पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला. सीमा कुलकर्णी यांनी गीत सादर केले .

Tags: