बेळगावात रविवारी ईद मिलादची मिरवणूक काढण्यात येणार असून, शहरात लावण्यात आलेल्या पॅलेस्टाईन ध्वजासारखा पेंडॉल पोलिस विभागाने हटवला आहे .
बेळगावातील गणेशोत्सवाची पार्श्वभूमी मुस्लिम समाजाने गणेशोत्सवानंतर ईद मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने ईद मिलाद मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात सर्वत्र पूर्वतयारी सुरू झाली आहे. मात्र, शहरातील दरबार गल्लीत पॅलेस्टाईनच्या ध्वजासारखा पेंडॉल घालण्यात आला होता . याची माहिती समजताच पोलीस विभागाने तो पेंडॉल हटवला .


Recent Comments