बेळगाव शहरातील टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला बसस्थानक बांधावेत, अशी मागणी भारतीय संस्कृती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
आज भारतीय संस्कृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूला बसस्थानक नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास होत आहे. बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांना उन्हात, पावसात ताटकळत थांबावे लागत आहे.

हि समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष पुरवावे, तसेच लवकरात लवकर या भागात बसस्थानक उभारण्यात यावे, यासह रेल्वेगेटनजीक उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


Recent Comments