Belagavi

मनपावरील दंडात्मक कारवाईची स्मार्टसिटीने पूर्तता करावी : माजी आम. रमेश कुडची

Share

ओल्ड पी बी रोड – बँक ऑफ इंडिया सर्कल भूसंपादन प्रकरणी मनपाच्या डोक्यावर आलेले २० कोटी रुपयाच्या दंडाचे प्रकरण कुणामुळे झाले? हि परिस्थिती कुणामुळे ओढवली? याचा आधी उलगडा झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि माजी महापौर रमेश कुडची यांनी व्यक्त केली आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार रमेश कुडची म्हणाले, ओल्ड पी बी रोड – बँक ऑफ इंडिया सर्कल भूसंपादन प्रकरणी जागामालकांना २० कोटींची भरपाई देण्याचा आदेश होता. यानंतर झालेल्या सुनावणीत जागा मालकांना जमीन परत देण्यासंदर्भात निर्णय झाला. मात्र या संपूर्ण प्रक्रियेचा तोटा कुणामुळे झाला? ज्या अधिकाऱ्याने हि चूक केली त्याला शेवटपर्यंत पदोन्नती मिळू नये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

2021 मध्ये, बेळगाव आयुक्तांनी जारी केलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 80 फूट रस्ता बांधण्यात आला, याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाऊन बेळगाव जिल्हा पालक मंत्र्यांनी या रस्त्याच्या बांधकामामागील सूत्रधार शोधून त्याचे नाव आधी उघड करावे, अशी मागणीही माजी आम. रमेश कुडची यांनी केली.

एसपीएम मार्गावरील दुपदरी रस्त्याच्या बांधकामाचा खर्च स्मार्ट सिटीने उचलावा आणि महापालिकेवर कोणताही बोजा पडू नये यासाठी पुढील महापालिकेच्या बैठकीत चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली.

Tags: