Belagavi

तनया चलवेटकर हिची बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

Share

सुळगा हिंडलगा येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थीनी कु.तनया जोतिबा चलवेटकर हिची बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

मच्छे येथील तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विजया नाईक, क्रीडा शिक्षिका संगीता कुडची, तसेच शाळा सुधारणा कमिटीचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी प्रोत्साहन दिले आहे.या गुणवंत खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: